Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विटेकरांच्या डोळ्यात धूळफेक कोण करतंय ? मनसे चा सवाल

 विटा : प्रशासनाला निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा, कृष्णत देशमुख व अन्य.

विटा ( मनोज देवकर )

       राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील नेवरी नाका ते खानापूर नाका ,विटा या टप्प्यात डांबरीकरन करून कोणाचा फायदा करून दिला जात आहें? प्रस्तावित काम काँक्रीटीकरणचे असतांना डांबरीकरनाचा घाट कोणी घातला आहें? राजपथ इंफ्रोकॉम प्रा. ली. कंपनी कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय? असा संतप्त सवाल मनसे कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

       राजपथ कंपनी ने वर्क ऑर्डर नुसार काँक्रीटीकरणाचे काम असताना सुद्धा नेवरी नाका ते साई हॉस्पिटल हे डांबरीकरण सुरू केले आहे. तरी हे काम तातडीने बंद करून वर्क ऑर्डर प्रमाणे काँक्रीटीकरण करूनच हे काम पूर्ण करावे अशी मागणी मनसे चे साजिद आगा, कृष्णत देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

      विटा शहराची सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे. स्वच्छता अभियानात देशात नावलौकिक मिळाला आहे. त्याबद्दल नगरपालिका व विट्यातील सत्ताधारी यांचं कौतुकच आहे . पण आज विट्यात जिकडे तिकडे रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसतात. खड्डे पडले की वरवरची मलमपट्टी केल्यासारखे डांबरीकरण केले जाते. हे रस्ते वर्षभर ही टिकत नाहीत. तरी रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे विशेष लक्ष सत्ताधारी देणार का? हा प्रश्न आहे.

Post a comment

0 Comments