Daily Mahasatta

Daily Mahasatta

अरुण लाड, जयंत आसगावकर यांना मोठे मताधिक्य देणार : आ. मानसिंगराव नाईक

शिराळा (राजेंद्र दिवाण)
शिराळा तालुका क्रांतिकारक व पुरोगामी विचारांचा वसा व वारसा जपणाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील, व महाविकास आघाडीचे पुणे विधान परिषद निवडणुकीत पदवीधरचे उमेदवार अरुणअण्णा लाड व शिक्षकचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना मोठे मताधिक्य देईल, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखाना जवळील चिंतन मंडपात पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा. अरुण गणपती लाड व पुणे शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांच्या प्रचारार्थ शिराळा तालुकास्तरीय मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, आज पर्यंत भाजपने जनतेला भुलवायचे काम केले आहे. गेल्या निवडणुकीत पदविधारांचे नेतृत्व करणाऱ्यांनी पदवीधरांचा एकतर प्रश्न मार्गी लावला ? का मी पदविधारांचा आमदार आहे, याचा उल्लेख केला ? अरुणअण्णा लाड हे क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या क्रांतिकारक विचारांचा वारसा चालवत आहेत. ते पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावतील. शिक्षकांचे प्रश्न प्रा. आसगावकर सोडवतील यावर विश्वास आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकत विरोधी भाजपला दाखवून देण्याची संधी आली आहे. ती मतदारांनी दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, आपले लक्ष्य भाजप व त्यांच्या विचारसरणी आहे. या निवडणूकीतील मतदान इव्हिएम मशीन वर नसून मतपत्रकेवर आहे. नवीन मतदारांनी गोंधळून न जाता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावापुढील चौकोनात मराठी अथवा इंग्रजीमध्ये एक हा अंक लिहून मतदान करावे.
युवा नेते विराज नाईक म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार पदवीधरांना व शिक्षकांना न्याय मिळवून देतील. अनेक वर्षांपासूनचे प्रश्न विधान परिषदेत मांडतील. शिराळा तालुक्यात मतदारांशी संपर्क सुरू असून. बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. रवी पाटील यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे देवेंद्र धस, तालुक्याचे उपसभापती बी. के. नायकवडी यांची भाषणे झाली. यावेळी फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, माजी सरपंच प्रमोद नाईक, पृथ्वीसिंग नाईक, संचालक सर्वश्री दिनकरराव पाटील, सुरेश पाटील, बिरुदेव आमरे, शिवाजी पाटील, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, दत्तात्रय पाटील, पलूस तालुक्याचे उपसभापती अरुण पवार, सभापती वैशालीताई माने, प. स. सदस्य मनीषा गुरव, नगराध्यक्ष अर्चना शेटे, सभापती सुनीता निकम, मोहन जिरंगे, प्रतिभा पवार, संजय हिरवडेकर, माजी नगराध्यक्ष सुंनदा सोनटक्के, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुहास घोडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष पौर्णिमा पवार, सुनील कवठेकर, राजू निकम, राजसिंह पाटील, विजयकुमार पाटील, पदवीधर तालुकाध्यक्ष केतन पाटील, विश्वास व विराज उद्योग समुहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, पदवीधर व शिक्षक मतदार आदी उपस्थित होते.
....................................
मंत्री जयंत पाटील
यांचा मोबाईल वरुन संवाद

बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील मोबाईल वरून उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, मतदारांनी महाविकास आघाडीची ताकत मोठी आहे, हे दाखवून द्यावे. दोन्ही उमेदवार मतदारांशी पाईक राहून काम करतील. प्रत्येक मतदारपर्यंत पोहचावे. शिराळा तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल, याचे खात्री आहे.
....................................

Post a Comment

0 Comments