Daily Mahasatta

Daily Mahasatta

ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा

पेठ (रियाज मुल्ला)
         ऑनलाइन शिक्षणाच्या सक्ती पायी गोरगरीब पालकांनी मोलमजुरी करून उसनवारी घेऊन महागडे मोबाईल घेतले. शिक्षणासाठी डेटा लागत असल्याने 200 पासून 600 पर्यंतचे ब्लेन्स मारले मात्र नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून सर्व शाळा, कॉलेज बंद असल्याने शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरु केले. ज्या गोरगरीब पालकांना साधा मोबाईल घेण्याची परिस्थिती नव्हती अशा पालक वर्गाना मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून अँड्रॉइड मोबाईल घेऊन देताना तारेवरची कसरत करावी लागली. या दिव्यातून बाहेर पडले तरी त्याला महिन्याला मारावा लागणारा नेट पॅक चा बेलेन्स ने जीव मेटाकुटीला आला आहे, त्यात च नेटवर्क नसल्याने हा बॅलन्स फुकट जात आहे.
          भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणण्याची वेळ गोर गरीब कुटुंबातील पालकांच्यावर आली आहे. शाळेत जाऊन मुलांना जे कळत नाही ते ऑनलाइन मोबाईल वर काय समजणार असा सूर पालकांच्यात उमटत आहे. काही ठिकाणी नेटवर्क येत नाही म्हणून मुले ऑनलाइन अभ्यास पूर्ण करू शकत नाहीत.
ऑनलाइन च्या नावाखाली मुलांना दिवसभर मोबाईल हाताळण्याची चांगलीच सवय लागली आहे. मात्र नेटवर्क चा अभाव निर्माण झाल्याने ऑनलाइन च्या नावाखाली मुले अभ्यास च्या नावाखाली गेम खेळण्या सारखे उद्योग सुरु झाले आहेत.
         त्यामुळे ऑनलाइन शिक्षण नसलेले नेटवर्क, मारला जाणारा नेट चा बेलेन्स ,यातून शिक्षणाचा किती फायदा अन कोणाला झाला असा सवाल पालक वर्गातून होत असून शासनाची ऑनलाइन शाळा, मोबाईल, मोबाईल ला लागणारा डाटा, त्याला नसलेले नेटवर्क, यात बिचारा पालक वर्ग मात्र पुरता कोलमडून गेला आहे.
...........................
     पालकांंची खंंत..
     ऑनलाइन शिक्षणासाठी पाठवले जाणारे व्हिडीओ, पीडीएफ फाईल्स, नेटवर्क अभावी डाऊनलोड होत नसल्याने ऑनलाइन अभ्यास क्रम पूर्ण होत नसल्याची खंत आहे.
विजय चव्हाण
पेठ, पालक

Post a Comment

0 Comments