Daily Mahasatta

Daily Mahasatta

कामेरीत जय भवानी सोसायटीच्यावतीने कोरोना योद्धांच्या सत्कार

पेठ : कोरोना योद्धांचा सत्कार करताना सम्राटबाबा महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील व अन्य.

पेठ (रियाज मुल्ला)

कामेरी तालुका वाळवा येथील जय भवानी सोसायटीच्या वतीने कोरोना काळातील गेली सात महिने झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार युवा नेते भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सम्राटबाबा महाडिक आणि जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कामेरीत गेल्या सात महिन्यात 259 रुग्ण आढळून आले. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. बाकीचे रुग्ण कोरोना मुक्त झाले. कोरोनाच्या काळापासून झटणाऱ्या कामेरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सुनंदा पाटील, ग्राम विकास अधिकारी आनंदराव पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नंदू काका पाटील हे कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, कोरोना दक्षता समिती यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच जयराज पाटील, किरण पाटील, राकेश पाटील, दीपा पाटील, सदाशिव पाटील, पंडित पाटील, ज्ञानदेव जेडगे, यासीन मगदूम , गुंडा माळी, अशोक जाधव , संताजी पाटील, दिनकर बाबर, नचिकेत निंबाळकर, अजित पाटील, बजरंग जाधव ,आनंदराव शेलार उपस्थित होते .

याप्रसंगी कपिल ओसवाल व अमित ओसवाल या दोघांनी इस्लामपुरात कोरोनाच्या काळात केलेल्या विशेष कार्याचे कौतुक करत त्यांचाही सत्कार करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक दिलीप जाधव यांनी केले तर आभार जयदीप पाटील यांनी मानले.
..............................
कोरोनाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत कमी प्रमाणात आहे मात्र दुसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.
आनंदराव पवार
ग्रामविकास अधिकारी कामेरी

Post a Comment

0 Comments