Daily Mahasatta

Daily Mahasatta

काळ्या कृषी कायद्याविरोधात सांगलीत उद्या काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली

          पृथ्वीराज पाटील, 
          काँग्रेस जिल्हाध्यक्ष
        
सांगली, (प्रतिनिधी ) 
        केंद्र सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या काळया कायद्यांची अंमलबजावणी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत व कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता सांगली शहरातून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.

        श्री. पाटील यांनी सांगितले की, ट्रॅक्टर रॅलीची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता एसटी स्टँड पासून होईल, शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली अकरा वाजता नेमिनाथनगर ग्राउंडवर समाप्त होईल. शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर घेऊन सकाळी नऊ वाजताच एसटी स्टँड जवळ जमावे.

      ;रॅलीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सोनम पटेल, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, निरीक्षक तौफिक मुलाणी तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी होणार आहेत.

        केंद्र सरकारने बळाचा वापर करून केलेल्या कायद्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. भांडवलदारांच्या साठीच हे कायदे आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या हिताचे असे काहीच नाही, त्यामुळेच हे कायदे त्वरित रद्द करावेत, या मागणीसाठी पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आंदोलने चालूच राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
-----------

Post a Comment

0 Comments