बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्ष पदी महेश पटेल

कुपवाड (प्रमोद अथणीकर)

       बजरंग दलाच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी बजम महेश पटेल याची नियुक्ती करण्यात आली. या निवडीसाठी नुकतीच बैठक संपन्न झाली.

       पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत, तालुका, तहसील पदाधिकारी यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गात केंद्रीय महामंत्री श्री. देवेश उपाध्याय यांनी श्री. महेश पटेल यांची सांगली जिल्हा बजरंग दलाच्या अध्यक्षपदी निवड घोषित करून त्यांना निवडीचे प्रमाणपत्र ही या वेळी देण्यात आले. या वेळी महामंत्री श्री. उपाध्याय यांनी संघटनेची कार्यपद्धती, कुठलाही कार्यक्रम राबवतांना घ्यायची काळजी, तसेच नियोजनाविषयी मार्गदर्शन केले.

Post a comment

0 Comments