Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रा. सोमनाथ साळुंखे विक्रमी मतांनी विजयी होणार : -जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत

सांगली, प्रतिनिधी) -

एक डिसेंबर रोजी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे विक्रमी मताने विजयी होतील, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केला. या विजयाचे शिल्पकार सातारा जिल्हा असणार असे अभिवचन त्यांनी दिले. सातारा येथे उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

प्रा. सोमनाथ साळुंखे हेच पदवीधर मतदारसंघातील सर्वाधिक पात्र उमेदवार आहेत. पदवीधरांच्या प्रश्नाची त्यांना चांगली जाणिव असून ते प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहतील. पुणे, सातारा , सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्वच जिल्ह्यातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र सातारा जिल्हाच साळुंखे सरांच्या विजयाचा शिल्पकार ठरणार आहे, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडी सदस्य सचिन जोरे, भारिप बहुजन महासंघ, भारिप महिला आघाडी, भारिप युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी प्रा. साळुंखे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय केला.

Post a Comment

0 Comments