Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतमजुराची गळफास घेवून आत्महत्या

जत ( सोमनिंग कोळी)

जत तालुक्यातील करजगीत शेत मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.19) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मढीवाळप्पा पराप्पा तिकोटी (वय 50 रा. करजगी, ता. जत ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उमदी पोलीसात फिर्याद दाखल आहे.

अधिक माहिती अशी, दुष्काळी जत तालुक्यातील मढीवाळप्पा तिकोटी हे मागील दहा वर्षापासून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात मध्ये मजुरी काम करतात. तेथेच पत्नी, दोन मुले असे कुंटुबासह राहतात. गेल्या आठ दिवसापुर्वी ते दीपावलीसाठी म्हणून करजगी या मुळगावी आले होते. आज गुरूवारी गावाशेजारी असलेल्या रुद्रप्पा अक्कलकोट यांच्या शेतात मढीवाळप्पा यांचा लिंबाच्या झाडाला गळफास लावलेला संशयास्पद मृत्तदेह आढळून आला. घटनेने गावात एकच खळबळ आहे.

शेतमालक रुद्राप्पा अक्कलकोट यांनी उमदी पोलीस ठाणे वर्दी दिली आहे. घटनास्थळी उमदी ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव दांडगे, बीट हवालदार नितीन पलुसकर यांनी मृत्तदेह खाली उतरवत, उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास नितीन पलुसकर करत आहे.

Post a Comment

0 Comments