Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रा. शरद पाटील हेच पदवीधरांचे गतिमान नेतृत्व : सरोज बाबर


सांगली (प्रतिनिधी)

स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय देशभक्त आर. पी. पाटील आण्णा यांच्या जाज्वल्य समाजसेवेचा वसा आणि वारसा ज्यांना लाभला आणि तो तितक्याच समर्थपणे ज्यांनी सांभाळला ते कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे माजीशआमदार, प्राध्यापक शरद पाटील सर. स्वर्गीय देशभक्त आर. पी. पाटील आण्णा आणि श्रीमती सुंदराबाई यांच्या पोटी जन्माला आलेलं एक रत्न म्हणजे माजी आमदार, प्राध्यापक शरद पाटील सर.

एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक शरद पाटील सर . प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सरांनी पूर्ण केले आणि इंग्रजी या विषयातून पद्व्युत्तर (𝓜𝓐 ) पदवी चे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली याठिकाणी आपली शिक्षण क्षेत्रातील सेवा सुरू केली. एक उत्तम प्राध्यापक म्हणून उत्तमातील उत्तम शिष्य घडवत सरांनी अल्पावधीतच आपलं नाव विद्यार्थ्यांच्या हृदयावर कोरण्यास सुरुवात केली.

दरम्यान सर 80 च्या दशकात सांगली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून गेले. त्या ठिकाणीही सरांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आणि अनेकांना आपल्या सामाजिक कार्याची जाणीव करून, कार्याचा एक वेगळा आदर्श त्यांनी आपल्यासारख्या अनेकांसमोर उभा केला. राजकारण हा धंदा नसून ती एक लोकसेवेची, जनकल्याणाची, वंचितांना न्याय देण्याची, उपेक्षितांचे हात बळकट करण्याची संधी आहे, हा विचार मनामध्ये ठेवून त्यांनी आपले राजकारण केले. आदरणीय लोकनेते राजारामबापू पाटील यांना ते आपले राजकीय गुरू मानत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आदरणीय प्राध्यापक शरद पाटील सर यांना दोन वेळा मिरज विधानसभा मतदारसंघ आणि एक वेळा पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

या संधीचं सरांनी सोनं केलं आहे. या माध्यमातून सरांनी अनेकांचे संसार उभे केले. या माध्यमातून सरांनी अनेकांचे संसार उभे करत असताना समाजकार्याचा एक आदर्श दीपस्तंभ उभा केला आहे. शिक्षण क्षेत्र, कृषी क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, सहकार क्षेत्र,राजकारण आणि समाजकारण अशा अनेक क्षेत्रात सरांनी केलेलं काम लाख मोलाचं आहे. समाजातील दीन-दलित, दुबळे, शेतकरी, मजूर, अपंग, निराश्रित, सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर यांच्यासाठी सरांनी आजवर अनेक प्रकारचं काम केलेलं आहे. शेतात काबाड कष्ट करणारा शेतकरी या जनतेचा पोशिंदा आहे. या पोशिंद्या शेतकऱ्याला मासिक दोन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे याकरिता सरांनी कोल्हापूर ते नागपूर विधानभवन असा पायी मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना जाग आणण्याचे काम केलं आहे.

अनेक शिक्षण संस्था, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून सरांनी आपलं कार्य आज अखेर सुरू ठेवलेलं आहे. वृद्ध सेवा आश्रम संस्था, कुपवाड, या सेवाश्रम संस्थेला सरांच्या कुशल मार्गदर्शनामुळे राष्ट्रपतींचं बेस्ट सेवा पदक मिळालं आहे. या वृद्ध सेवाश्रमात अनेक वृद्ध,निराश्रित लोकांची उत्तम सेवा केली जाते. यशवंत शिक्षण संस्था कुपवाड, या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन सरांनी अनेक लोकांचे संसार फुलविले आहेत आणि हजारो विद्यार्थी घडविण्याचे पवित्र काम सर करीत आहेत. बी + श्रेणीच्या मिरज महविद्यालय मिरजसह अनेक शाखांमध्ये आदरणीय सरांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थी घडविण्याचे पवित्र काम सुरू आहे.

विविध सामाजिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक गरजू हातांना त्यांनी आर्थिक पत मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. जात-पात-धर्म -वंश या प्रकारच्या कोणत्याही प्रकारचं बंधन न पाळता सर समाजातील सर्व लोकांसाठी कार्यरत असतात.
मित्रहो सध्या आपण सर्वजण कोरोना महामारी च्या संकटाने त्रस्त आहोत या संकटात सुद्धा आदरणीय सरांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता कुपवाड आणि परिसरातील घराघरांमध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसह लोकांचा सर्वे केलेला आहे आणि त्यांना कोणत्या गोष्टी हव्या आहेत याची चाचपणी करून, लोकांच्या घरांमध्ये धान्य व इतर जीवनावश्यक सुविधा पुरवण्याचे अतिशय पवित्र असं काम केलेलं आहे. या त्यांच्या कामाकरिता बेस्ट कोविड योद्धा म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे. मित्रहो शिक्षकांचे पगार पूर्वी रोखीने हाती दिले जायचे, परंतु आज ते आपणाला बँकेच्या खात्यामध्ये जमा होत असलेले दिसून येतात. याकामी सुद्धा सरांनी अतिशय मोलाचे प्रयत्न केले आहेत.

पाटील सर स्वतः एक उत्तम वाचक आहेत. त्याचप्रमाणे स्वतः एक उत्तम खेळाडू सुद्धा होते आणि त्यामुळेच खेळाडू, कलावंत यांना ते राजाश्रय देतात आणि खेळाडूंच्या, कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात.
मित्रहो आज वरच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनात वावरत असताना सर एक निष्कलंक, चारित्र्यवान व्यक्ती म्हणून जगले. आज अखेर सरांनी केलेलं कार्य वाद - विवादा पलिकडचे आहे. मित्रहो सरांच्या सारखं कृतिशील, गतिमान, निष्कलंक, चारित्र्यवान, अभ्यासू नेतृत्व तुमच्या माझ्यासारख्या हजारो लोकांच्या उज्वल भवितव्यासाठी विधानपरिषदेमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आजही सर्वपक्षीय नेते मंडळींमध्ये सरांचे स्थान अतिशय आदराच असंच आहे. मित्रहो पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक मंगळवार, दि. 01 डिसेंबर 2020 रोजी होत आहे. या निवडणुकीमध्ये आपण सर्व पदवीधर मतदार बंधू-भगिनींनी मा. आमदार, प्राध्यापक शरद पाटील सर यांना प्रथम पसंतीचे ( क्र.1चे ) मत देऊन,तुमचे माझे विविध प्रश्न आक्रमकपणे विधिमंडळात मांडण्यासाठी निवडून देऊ या, असे आवाहन कलावंत विज्ञान शिक्षक सरोज बाबर यांनी केले आहे. 

Must read 

Post a Comment

1 Comments

  1. ONLY SHARAD PATIL FOR EVERY SENIOR CITIZEN IDEAL SOCIAL WORK AND A BEST GUIDE FOR ALL EDUCATED VOTERS.. WE ARE ALWAYS WITH. SIR SIR AND ONLY SIR.BEST OF LUCK...

    ReplyDelete