Daily Mahasatta

Daily Mahasatta

शासनाने लग्न कार्यासाठी पाचशे लोकांना परवानगी द्यावी : मंडप असोसिएशनची मागणी

: मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यवसायिक असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सांगली (प्रतिनिधी)
       लॉकडाऊनच्या काळात सांगली जिल्ह्यात मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे १०० कोटींचे नुकसान झाले आहे. मंडप व्यवसायिकांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासनाने लग्न कार्यास उपस्थित राहण्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी, यासह अन्य मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप , लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यवसायिक असोशियनकडून धरणे आंदोलन करण्यात आले.
       लॉकडाऊन काळात आणि आजही मंडप व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 10 ते 15 मंडप व्यवसायिकांनी आत्महत्या केली आहे. अशीच परिस्थिती आपल्या जिल्ह्यात ही होत आहे. मंडप व्यवसाय आणि त्याच्याशी निगडित असणारे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील मंडप डेकोरेटर्स यांनी आज 2 नोव्हेंबर रोजी सांगलीत एक दिवसाचे राज्यव्यापी आंदोलन केले.       
       लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यातील 1250 हून अधिक मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे मंडप व्यावसायिकांचे साहित्य हे अक्षरशः धूळ खात पडले आहे. यातच सरकारने लग्न कार्यासाठी 50 लोकांनाच उपस्थित राहणेची परवानगी दिली असल्याने मंडप व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे उपस्थितीची 50 लोकांची मर्यादा उठवून 500 करावी. अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. सांगली जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील 1250 मंडप व्यावसायिक आणि जवळपास 10000 कामगार व त्याच्याशी संबंधित असणारे सर्व व्यवसायधारक हे आंदोलनात सहभागी झाले आहेत.  
       या आंदोलनात मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेटर्स असोशियनचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते. या मागण्यांचे निवेदन उद्या सकाळी महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये एकाच वेळी सर्व तहसीलदारांना देणार असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी दिली.
आमदार सुधीर गाडगीळ, युवानेते रोहित पाटील उर्फ ज्युनिअर आर. आर. तसेच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध सव्वीस संघटनेच्या पदाधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठींबा दिला.

Post a Comment

0 Comments