Daily Mahasatta

Daily Mahasatta

शासकीय व खासगी नोकर्यातील कंत्राटी पध्दत बंद करा : प्रा. दादासाहेब ढेरे


कवठेमहांकाळ,( अभिषेक साळुंखे)

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली शासकीय व खासगी नोकर्यांतील कंत्राटी पध्दत बंद करावी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना कायम नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शाहू कला , क्रीडा व सांस्कृतिक विचार मंचच्यावतीने विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे यांनी केली .

प्रा . ढेरे म्हणाले , गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पध्दत सुरू आहे . अत्यंत अल्प वेतन किंवा मानधन देऊन सुशिक्षित बेरोजगार युवकांना राबवून घेतले जाते . माध्यमिक शाळा, शासकीय कार्यालये, खासगी उद्योग अशा विविध ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार युवकांना कंत्राटी पध्दतीने काम दिले जाते. या कंत्राटी युवकांना नोकरीतून कधीही काढून टाकले जाते. त्यांना वेठबिगाराप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यांना कोणत्याही शासकीय सवलतींचा लाभ मिळत नाही. त्यांच्या भविष्याची कोणतीच हमी नसते.

त्यामुळे ते नेहमी तणावात जीवन जगत असतात, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते . अशा युवकांवर अन्याय , तर उच्चपदस्थांना मोठे गलेलठ्ठ पगार देऊन त्यांना कायमस्वरुपी नेमणूक मिळते. हा शासनाचा दुजाभावच म्हणावा लागेल. त्यामुळे तात्काळ कंत्राटी पध्दती बंद करून सेवेच्या कायम नेमणुका व्हाव्यात , असेही ढेरे म्हणाले.

Post a Comment

0 Comments