शिराळा (राजे़ंद्र दिवाण)
मांगले येथील डॉ. बी. एन. पाटील यांच्या गंधा नर्सिंग होम दवाखान्याच्या दाराच्या कुलपाची कडी उचकटून लॉकरमधील २९ तोळे सोने दहा भार चांदी व रोख ५० हजार रक्कमेवर डल्ला मारणा-या गावातीलच सराईत चोरट्याच्या अवघ्या बारा तासात शिराळा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. राहुल उत्तम देवकर (वय २४) रा. मांगले असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर कोडोली , हातकणंगले पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
देवकर तब्बेत बरी नसल्यामुळे मंगळावरी रात्री डॉ. बी. एन. पाटील यांच्या दवाखान्यात गेला होता. मात्र दवाखान्याला कुलूप असल्याचे पाहून या संधीचा फायदा घेवून त्याने त्याच रात्री उशीरा दराचे कुलूप उचकटून तिजोरीतील दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला होता. शिराळा येथील लक्ष्मी चौकातील सिद्धनाथ ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरटा सोन्याच्या बांगड्या विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खब-या कडून मिळाल्या नंतर शिराळा पोलिसांनी सापला रचून त्याला रंगेहात पकडले. त्याला ताब्यात घेवून पोलीसी हिसका दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कडून बांगड्या हस्तगत केल्या, त्यांनतर दुपारी त्याच्या मुसक्या आवळून घटनास्थळी आणण्यात आले.
चोरी कशी केली याचे प्रात्यक्षीक त्याने यावेळी दाखवले. त्यांनतर त्याने चोरीची कबुली दिल्याप्रमाणे देवकर गल्लीतील त्याच्या घरात पोलीस त्याला घेवून गेले. त्याने मुद्देमाल घराच्या माळ्यावर ठेवला असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्या आईने २९ तोळे सोने, दहा भार चांदी व ५० हजार रोख रक्कमे पैकी २० हजार रुपये पंचाच्या समक्ष पोलिसांच्या ताब्यात दिले.
इस्लामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, विनोद जाधव, चंद्रकांत कांबळे, कालिदास गावडे, अरुण कानडे, नितीन यादव, अभिजित पवार, युवराज जगदाळे, स्नेहल कुंभार, अमृत कुंभार, रणजीत टोमके,यांच्या पथकाने ही चोरी उघडकीस आणली .

0 Comments