Daily Mahasatta

Daily Mahasatta

बालसंगोपन योजनेचा लाभ घ्या : पंचायत सामिती सदस्य रविंद्र ठोंबरे

कडेगाव ( सचिन मोहिते)
       कडेगाव तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व आई वडीला पैकी एकजण मयत असेल तर त्यांना बालसंगोपन योजना अंतर्गत शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक मदत दिली जाते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्ग एक यांच्याकडून सदरची योजना राबवली जात असून त्यासाठी तात्काळ सादर करावेत असे आवाहन कडेगाव पंचायत समिती सदस्य रवींद्र ठोंबरे यांनी केले आहे.

        जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्ग यांच्याकडून आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा मृत्यू झालेल्या बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीची शिष्यवृत्ती योजना राबवली जाते त्यांची सर्वसामान्यांना विशेष माहिती दिली जात नाही.

       सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करावे असे आव्हान रवींद्र ठोंबरे यांनी केले आहे. बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शिक्षण घेत असलेल्या बालकाचे चार पासपोर्ट साईज फोटो , बालकाचा शाळेचे बोनाफाईड, आधार कार्ड झेरॉक्स, पालकांचा मृत्यू दाखला , रहिवासी प्रमाणपत्र , त्या बालकाचा सांभाळ करणाऱ्या पालकांचे वैद्यकीय फिट असल्याबाबतचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र , सांभाळ करणाऱ्याचे त्या बालकासह घरासमोरील फोटो, सांभाळ करणाऱ्याच्या बँकेचे पासबुक झेरॉक्स या सर्व कागदपत्रांसह ही अर्ज सादर करायचा असून कडेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त आई किंवा वडील नसलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments