Daily Mahasatta

Daily Mahasatta

पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांचा अर्ज दाखल

पुणे : अरुण लाड यांचा अर्ज दाखल केल्यानंतर विजयी निशानी दाखवताना नाम. जयवंतराव पाटील, नाम. बाळासाहेब थोरात, नाम. विश्वजीत कदम, नाम. सतेज पाटील, खास. वंदना चव्हाण, रुपाली चाकणकर.

सांगली (प्रतिनिधी)

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांचा उमेदवारी अर्ज आज गुरुवार १२ रोजी पुणे विधानभवन येथे दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राज्य मंत्री विश्वजीत कदम, राज्य मंत्री सतेज पाटील, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सांगली जिल्ह्यातील कडेगाव मतदारसंघातीलच अरूण अण्णा लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अरुण लाड यांनी गतवेळी पदवीधर मतदारसंघांतून अपक्ष उमेदवारी दाखल करत लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला होता. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेच अरुण लाड यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे.

अरुण लाड यांना क्रांतीअग्रणी जे. डी. बापू लाड यांच्या सामाजिक कार्याचा मोठा वारसा आहे. तसेच एक यशस्वी आणि प्रामाणिक उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. गतवेळीच्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्याने अरुण लाड यांनी सुमारे सहा महिन्यापासूनच जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पाचही जिल्ह्यात त्यांची यंत्रणा सक्रिय झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील कडेगाव मतदारसंघातील असल्यामुळे पलूस कडेगाव तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
...................................
मतदार अरुण अण्णांच्या
बाजुनेच कौल देतील...

पुणे पदवीधर मतदारसंघात सुशिक्षित आणि कार्यतत्पर उमेदवार देणे गरजेचे होते. क्रांती समूहाच्या माध्यमातून अरूण अण्णा यांनी सामाजिक कार्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांची निवड केली. मला खात्री आहे की मतदार त्यांच्या बाजूनेच कौल देतील.

नाम. जयंतराव पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष. 

Post a Comment

0 Comments