Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्हा कोरोना मुक्तिकडे, आज दिवसभरात केवळ २८ रुग्ण पाॅझीटीव्ह

सांगली (प्रतिनिधी)

गेल्या महिन्याभरापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट होत असून सांगली जिल्हा आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. आज सोमवार ता. १६ रोजी संपूर्ण जिल्ह्यातून केवळ २८ रुग्णांचे कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत.
त्यामुळे आगामी महिन्यात सांगली जिल्हा पुर्णतः कोरोना मुक्त होणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुंबई आणि पुणे नंतर सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा शासनासाठी डोकेदुखी ठरला होता. गेल्या आठ महिन्यात सुमारे ४६ हजार पेक्षा अधिक रुग्णांचे कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आले. तर १६८२ रुग्णांना उपचारादरम्यान प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली. परंतु पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरु आहे

आजअखेर सांगली जिल्ह्यात ४६ हजार १२१ रूग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. यापैकी ४४ हजार ४२ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे तर १६८२ रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. गेल्या महिन्याभरातील कोरोनाचा आलेख पाहता आगामी महिन्यात सांगली जिल्हा पुर्णतः कोरोना मुक्त होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र संभाव्य दुसर्या लाटेची शक्यता ग्रहित धरुन नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
------------------------------------------
कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांची
आजची तालुकानिहाय आकडेवारी

आटपाडी ( ५) जत ( ४ ) कडेगाव ( ०) कवठेमंकाळ ( ०) खानापूर ( २ ) मिरज ( ३ ) पलूस ( १ ) शिराळा( ० ) तासगाव( ०) वाळवा ( ० ) आणि सांगली मनपा (११ )

Post a Comment

0 Comments