Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक : माजी आमदार अॅड सदाशिव पाटील

विटा ( प्रतिनिधी

पुणे विभागातील पदवीधर मतदार संघांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. अरुण (आण्णा ) लाड व शिक्षक मतदार संघांचे उमेदवार प्रा. जयंत असगावकर यांच्या प्रचारार्थ शनिवार ता २१ रोजी भैरवनाथ मंगल कार्यालय विटा येथे बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती माजी आमदार अॅड सदाशिव पाटील यांनी दिली आहे.

माजी आमदार अॅड पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत असगावकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडुण आणण्यासाठी बुथनिहाय मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली आहे.

शनिवार ता. २१ रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित केली आहे. तरी सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी देखील उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार सदाशिवराव (भाऊ ) पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब मुळीक यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments