Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

' पार्टनरशिप ' मधल्या सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे : ठाण्याचे आमदार संजय केळकर' पार्टनरशिप ' मधल्या सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे : ठाण्याचे आमदार संजय केळकर

सांगली ( प्रतिनिधी )
भरकटलेलं सरकार असल्याने मंत्रालयात बदल्यांशिवाय दुसरी कोणतीच कामे होत नाहीत. त्याठिकाणी मोठी दुकानदारी सुरु आहे. हे रोखण्यासाठी विधानपरिषदेत आपली माणसे जाण्याची गरज आहे. पार्टनरशिपमध्ये चाललेल्या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे अशी टीका ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केली.

पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ महिला परिषद व गावभाग येथील श्री हरिदास भवन येथे संपन्न झालेल्या पदवीधर शिक्षकांच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. केळकर बोलत होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त करताना भाजप व मित्रपक्षांच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

आ. केळकर यांनी आपल्या भाषणात, 'एका विचारधारेवर काम करणारे दोन्ही उमेदवार आहेत. गाफील राहू नका. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जाण्याची आवशयकता आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे विधानपरिषदेत मांडण्याची गरज आहे. मतदार पदवीधर असूनही कित्येक मतं वाया का जातात हेच समजत नाही. हे जाणून घेण्यासाठी मतदान कसे करावे हे जाणून घेतले पाहिजे. अनेक प्रश्न सुटले असलेतरी अनेक प्रलंबित आहेत. शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. केंद्र सरकार शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल करीत असले तरी राज्यसरकार मात्र उदासीन आहे.

शिक्षकांनी कोरोनायोद्धा म्हणून चांगले काम केले आहे. सरकारची शिक्षक व शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता आहे. त्याना कसेही वापरले जाते. निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासने देणारे अनेकजण येतील. पण त्यांना भुलू नका. आपल्या प्रश्नांनाच्या खऱ्याखुऱ्या सोडवणुकीसाठी आपल्या दोन्ही उमेदवारांना विधानपरिषदेत पाठवा असे सांगितले.

शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे यांनी, 'दोन्ही उमेदवार प्रश्न अत्यंत तळमळीने मांडू शकतात त्यामुळे त्यांना विधानपरिषदेत पाठविण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यांनी, 'सांगली शिक्षण संस्था एक विचारधारा घेऊन काम करणारी संस्था आहे. त्यामुळे सांगली शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक १०० टक्के मतदान करतील. आपले मत वाया न जाऊ देण्याची काळजी घ्या असे सांगून आपला माणूसच सभागृहात गेला पाहिजे असे आवाहन केले. आभार पुरोहित कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा केतकर यांनी मानले. यावेळी शिक्षक परिषद राज्याचे अध्यक्ष वेनुनाथ कडू, पुणे विभागाचे राजेंद्र नागरगोजे, संघटक सरचिटणीस दीपक माने, नगरसेवक विनायक सिंहासने, नगरसेवक संजय कुलकर्णी, विजय भिडे, रामकृष्ण चितळे, गणपती साळुंखे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments