Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा शहराला स्वच्छतेत देशात अव्वल करणार : नागरिकांचा निर्धार

विटा शहरात 5 जनजागृती सभा संपन्न : विविध नवोपक्रमातून जनजागृती : विटेकर नागरिकांनी शहर स्वच्छतेत योगदान देण्याचे पालिकेचे आवाहन

विटा (प्रतिनिधी)
विटा नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत आज 24 रोजी कोरोना पार्श्वभूमीवर  शासन नियमांचे पालन करुन शहरात मोठ्या प्रमाणे स्वच्छता, प्लास्टिक, घनकचरा व्यवस्थापन, सेंद्रिय खत निर्मिती, व पदवीधर मतदान जनजागृती सुरू आहे. याअंतर्गत वार्ड क्रमांक 1 डवर गल्ली, वार्ड क्रमांक 2 सिद्धिविनायक कॉलनी, वॉर्ड क्रमांक 8 शिवाजीनगर, वार्ड क्रमांक 4, 24 कॅरेट रेसिडेन्सी तसेच वार्ड क्रमांक 12 गांधीनगर येथे जनजागृती मोहिमेअंतर्गत कार्यक्रम (सभा) घेत पालिकेने जनजागृती केली. या सभांमधून विटेकर नागरिकांनी विटा शहराला स्वच्छतेमध्ये देशपातळीवर अव्वल करण्याचा निर्धार केला. तसेच होम कंपोस्टींग व पथनाट्ये इत्यादी उपक्रम पालिकेच्यावतीने घेण्यात आले.

मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये जनजागृतीचे उपक्रम सुरू आहेत. कार्यालयीन अधिक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती विभाग प्रमुख नितीन चंदनशिवे यांच्या सहभागातून शहरांमध्ये स्वच्छता, प्लास्टिक व पदवीधर/शिक्षक मतदान, जनजागृतीचे कामकाज अश्वगतीने सुरू आहे. यामध्ये नगरपरिषद कर्मचारी, वॉर्ड अ़ॉफीसर, सहाय्यक, स्वच्छ शहर अंमलबजावणी कक्ष यांचेसह नागरिकांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments