Daily Mahasatta

Daily Mahasatta

दिवाळीची गोड बातमी, आता हिरो इलेक्ट्रीक बाईक कवठेमंहकाळ मध्ये उपलब्ध : सुरेश पाटील यांची माहिती

कवठेमंहकाळ ( अभिषेक साळुंखे)
        हिरो इलेक्ट्रिकने दिवाळीला गाडी खरेदीला डिस्काउंट देत बोनसच देण्याचे काम केले आहे. इलेक्ट्रिक बाईक मध्ये नामवंत कंपनी म्हणजे हिरो इलेक्ट्रिक आणि आता हिरो इलेक्ट्रिक गाड्या कवठेमंकाळ मध्ये उपलब्ध होत आहेत. ते ही नवीन स्टँड मागे महांकाली ई बाईक मध्ये. बॅटरी, मोटर, कंट्रोलर यांना तीन वर्षांची वॉरंटी मिळते तसेच कंपनीने सर्व मटेरियल चांगल्या क्वालिटीचे दिले आहे. गाड्या दिसायला आकर्षक आहेत, अशी माहिती महांकाली ई बाईकचे प्रोप्रायटर सुरेश पाटील यांनी दिली आहे.

        सुरेश पाटील म्हणाले, सर्वसाधारण विचार करता आपण 40 हजार किलोमीटर गाडी फिरवली तर सरासरी 85 रुपये पेट्रोल ने 68 हजार रुपये पेट्रोलला जातात (अवरेज 50 ने) आणि इलेक्ट्रिक बाईक ला 40 हजार किलोमीटर फिरवायला फक्त 4667 रुपये लागतात (सरासरी एकदा चार्जिंगला एक युनिट लाईट जाते.) म्हणजे पाच ते सात रुपयाची लाईट जाते. तुमचे फक्त पेट्रोलमधील 63,333 रुपये हे वाचणार आहेत. आणि आॅईल बदलीचा आपण यात विचार ही केलाच नाही. म्हणजे जरी तीन वर्षांनी जरी बॅटरी बदलावी लागली तर तुमची किंमत आधीच वसूल झाली असेल. आणि बॅटरी नीट वापरली तर बॅटरी चे आयुष्य 7 वर्षा पेक्षा जास्त आहे. मोटर, कंरोलर चे प्रॉब्लेम कमीच येतात किंवा येतच नाही.

       तसेच कमी वजनाच्या गाड्या असल्यामुळे वयस्कर आणि महिलांना गाड्या वापरायला खूप सोयीस्कर होतात. काही मॉडेल ना लायसन ची गरज देखील नाही. काही गाड्यांना आता सबसिडी चालू झाली आहे. सर्व्हिसिंग चा खर्च कमी येतो. तसेच सर्व्हिस ला सुद्धा कपंनी चांगले सहकार्य करत असते.

       शिवाय निसर्गालाही फायदा होतोय. देशालाही याचां फायदा पेट्रोलची बचत. ग्राहकाला ही फायदा. पैशाची बचत होईल. ग्राहकाच्या दृष्टीने चांगला फायदा होईल. महांकाली ई बाईक मध्ये हिरो इलेक्ट्रिक बाईक खरेदी करा आणि भविष्याची नवीन सुरुवात करावी, असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments