Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यात एकाच बँकेतील चार कर्मचारी पॉझिटिव्ह

विटा ( मनोज देवकर )

आज तालुक्यात नऊ जणांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. विट्यातील पाच, माहुली व आळसंद येथील प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एकाच बँकेतील चार कर्मचार्यांचा समावेश आहे. सद्या तालुक्यात एकशे दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

      अनेक सरकारी आस्थापना मध्ये नागरिकांना ऑफिसात प्रवेश दिला जात नाही. सोशल डिस्टन्स चे पालन केले जाते. पण आत काम करणारे कर्मचारी कोरोना होऊ नये म्हणून ची पथ्ये पाळताना दिसत नाहीत.  "जबतक दवाई नही , तबतक ढिलाई नही." असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. त्याचे पालन नागरिकांनी करावे. 

Post a comment

0 Comments