Daily Mahasatta

Daily Mahasatta

मोटारसायकल चोरून तिचे केले स्पेअर पार्ट, २० वर्षाचा आरोपी जाळ्यात

पेठ ( रियाज मुल्ला)
मोटरसायकल चोरुन तिचे स्पेअर पार्ट करुन विक्रीसाठी ठेवलेल्या वीस वर्षांच्या तरुणाला कुरळप (ता. वाळवा) पोलीसांनी गजाआड केले आहे. करण महादेव देवकर (वय 20 रा. कुरळप ता. वाळवा) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी दि.18 रोजी mh-10-DE7565. ही हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी चोरीला गेलेची ओंकार आनंदा जाधव रा. कुरळप ता. वाळवा यानी कुरळप पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. फिर्यादी मध्ये म्हंटले आहे की दि. 16रोजी गाडीवरून दिवसभर शेतातील काम करून रात्री राहत्या घराच्या अंगणात गाडी लावली होती. सकाळी अंगणात गाडी दिसून न आल्याने दिवसभर गावात व परिसरात चौकशी करण्यात आली मात्र कोठेही आढळून न आल्याने दि. 18रोजी अंगणातील गाडी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची तक्रार कुरळप पोलिसात दिली होती.

यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अनिल पाटील व पो. को. सचिन मोरे हे तपास करत असताना त्यांच्या खबरी कडून करण महादेव देवकर (वय 20रा. कुरळप ता. वाळवा) या तरुणाने गाडी चोरल्याची पक्की माहिती मिळाली. यावरून त्याला ताब्यात घेतले असता त्याने गाडी चोरल्याचे कबूल करून गाडीची पूर्ण पार्ट सुट्टे करून चेस विहिरीत टाकून दिली व स्पेअर पार्ट बॉक्स मध्ये घालून कुरळप येलूर रस्त्यावरील म्हसोबा पाणंद येथे ठेवण्यात आले असलेचे सांगितले. यावरून सपोनि अरविंद काटे, अनिल पाटील सचिन मोरे,गजानन पोतदार, यानी घटनास्थळी जाऊन गाडीचे स्पेअर पार्ट ताब्यात घेतले. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून आज इस्लामपूर न्यायालयासमोर दाखल केलें असता एक दिवसाची पोलिस कस्टडी मिळाली आहे. पुढील तपास पो. ह. गजानन पोतदार करीत आहे.

Post a Comment

0 Comments