Daily Mahasatta

Daily Mahasatta

संग्राम देशमुख यांचा विजय निश्चित : समरजीतसिंह घाटगे

मुरगुड : येथील भारतीय जनता पक्षाच्या पदवीधर मेळाव्यात बोलताना समरजीतसिंह घाटगे. यावेळी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख व अन्य.

कोल्हापूर (प्रतिनिधी)
पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांची पक्षाने योग्य निवड केली आहे. या मतदारसंघात भाजपचा प्रभाव मोठा आहे. पदवीधर मतदारांच्या मनात भाजपा बद्दल आपुलकी आहे. त्यामुळे संग्राम देशमुख  यांचा विजय निश्चित आहे , असे प्रतिपादन समरजीतसिंह घाटगे राजेसाहेब यांनी व्यक्त केले. 

 मुरगुड ता. कागल, जि. कोल्हापूर येथे भारतीय जनता पार्टीचे पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ पदवीधर कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी राहुल देसाई, अमरसिंह घोरपडे,  एम. पी. पाटील, दत्तामामा खराडे, मा. विरेंद्र माने उपस्थित होते. 

यावेळी घाटगे राजेसाहेब म्हणाले की, भाजपने या मतदारसंघात संग्राम देशमुख यांच्यासारख्या  तरुण तडफदार असा योग्य ताकदीचा उमेदवार दिला आहे. पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबध्द राहणार तसे त्यांचे व्यक्तिमत्व असल्याने पदवीधरांना मोठे बळ मिळणार आहे . यावेळी युवराज पाटील, संजय पाटील, सुनील सूर्यवंशी, सुनील मगदूम सर, डी . एस. पाटील सर, मारुती निगवे, रामभाऊ खराडे, कर्नल बाबर, एम. आय. चौगुले, संजय चौगुले तसेच कागल तालुक्यातील पदवीधर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments