Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अरुण लाड हे क्रांतीचा वारसा असलेले उमेदवार : माजी आम. सदाशिवराव पाटील

विटा : येथील भैरवनाथ मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात बोलताना माजी आम. सदाशिव पाटील. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर उपस्थित होते.

विटा ( मनोज देवकर )

पक्षीय भेद विसरून पदवीधर चे उमेदवार अरुण अण्णा लाड व शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करण्यासाठी काम करा. मागच्या वेळेपेक्षा यावेळी वातावरण चांगले आहे. अरुण अण्णा हे निस्पृह, क्रांतीचा वारसा असलेले उमेदवार आहेत. विरोधी उमेदवाराच्या मनात सुद्धा ज्यांच्या विषयी आदर आहे असा उमेदवार शरद पवार साहेबांनी दिला आहे. पक्षाच्या विचारांना बांधील असलेल्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करा असे आवाहन मा आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले. विटा येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विट्यात प्रमुख कार्यकर्ते व मतदारांचा मेळावा भैरवनाथ मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील , राष्ट्रवादी चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक , युवा नेते सुशांत देवकर , माजी जि. प. सदस्य किसन जानकर , कुंडल चे श्रीकांत लाड , विक्रांत लाड , रामराव दादा पाटील , युवानेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, संदीप मुळीक , राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नितीन दिवटे , किरण तारळेकर , गजानन निकम , तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, विशाल पाटील, प्रशांत पवार , महिला आघाडीच्या सुवर्णा पाटील व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत दादा सूर्यावर थुंकण्याचे काम करत आहेत . जातीयवादी , वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था येऊ नये म्हणून पुरोगामी विचारांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा, असे मत कुंडल चे श्रीकांत लाड यांनी व्यक्त केले. बीजेपी सरकारने इतर पक्षांना दिलेल्या हीन वागणुकीला प्रतिक्रिया म्हणून महाविकास आघाडी ची स्थापना झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , नामदार विश्वजित कदम , जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण अण्णा लाड व जयंत आसगावकर निवडून यावेत म्हणून प्रयत्नशील आहेत. असे प्रतिपादन ऍड. बाबासाहेब मुळीक यांनी केले.

जास्तीतजास्त पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करा. दोन्ही उमेदवार आपल्या घरचे आहेत. जवळचे आहेत. प्रा. जयंत आसगावकर हे शिक्षक व संस्था चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. पक्षाने जे उमेदवार दिले त्यांचेच काम करायचे आहे, असे आवाहन युवा नेते वैभव पाटील यांनी केले.

Post a comment

0 Comments