नेर्ले येथे ऊसाला आग लागून लाखोंचे नुकसान

पेठ (रियाज मुल्ला)
नेर्ले ता. वाळवा येथील बिरोबा मंदिर बनाजवळ असलेल्या सर्वे .नंबर 697 मधील साडेआठ एकर मधील आडसाली लागणीच्या ऊसाला गेली दोन दिवस आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे .आग विझवण्यासाठी इस्लामपूर नगरपालिका व हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने करून सात ते आठ तासात आग विझवण्याचे काम पूर्ण केले. आग कशाने लागले याचे कारण समजू शकले नाही.

सर्वे नंबर 697 मध्ये गेले दोन दिवस राजारामबापू साखर कारखाना व यशवंतराव मोहिते साखर कारखाना यांच्या ऊस तोडी चालू होत्या. या तोडी चालू असताना अचानक ऊसाला आग लागली. काल लागलेली विजली होती. परंतु दुसर्‍या दिवशी पुन्हा सकाळी नऊ वाजता आगीच्या भडक्याने ऊस पेटू लागला. आगीने रौद्ररूप धारण केले आग विजण्याच्या आवाक्याबाहेर गेली असता सर्वे नंबर 697 मध्ये हुतात्मा कारखान्याचे चिफ केमिस्ट बाबासो माने यांना त्यांच्या पुतण्याने फोन करून आपल्या उसास आग लागल्याचे कळविले. त्यानंतर इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझवण्यात कमी पडु लागली असता हुतात्मा चे चीफ केमिस्ट बाबासो माने यांनी हुतात्मा कारखाना वरून अग्निशामक दलाची गाडी मागवली. इस्लामपूर नगरपालिका आणि हुतात्मा कारखाना यांच्या अग्निशामक दलाने पाच-सहा तासाच्या अथक प्रयत्नाने लागलेली आग विझवण्यात आली.शंकर माने, बाबू श्रीपती माने , जालिंदर यशवंत पाटील , जालिंदर बापू पाटील , शिवाजी बापू पाटील, तानाजी बापू पाटील, बाजीराव बापू पाटील, आनंद हरी साळुंखे या सर्व शेतकऱ्यांचा ऊस आगीमध्ये भस्मसात झाला. या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झालेला दिसला.

दरम्यान कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गिरीष पाटील आणि त्यांच्याबरोबर नेर्ले शेतकी गटातील आनंदराव पाटील, मोहिते साहेब, राजारामबापू कारखान्याचे सुधाकर मोरे आणि श्रीकांत माने या शेतकीच्या लोकांनी भेट देऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत केली. संचालक गिरीश पाटील यांनी शेतकऱ्यांचा ऊस ताबडतोब कसा जाईल याची यंत्रणा लावा असा आदेश गट अधिकाऱ्यांना देऊन  शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

आग विजवण्यासाठी बाजीराव पाटील ,जयसिंग पाटील ,जयदीप पाटील, रणजित पाटील, कुलदीप पाटील, शुभम माने, अमोल माने या सर्व शेतकऱ्यांनी अग्निशामक दलाच्या गाड्या यायच्या अगोदर फडामध्ये शिरून ऊसाचे वाडे मोडून  लागलेली आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दरम्यान अग्निशामकाच्या दोन्ही गाड्या वेळेत आल्याने शेतकऱ्यांचे होणारे पुढील होणारे मोठे नुसकान टाळण्यात या शेतकऱ्यांना यश आले. जळीत ऊस कारखान्यात नेण्यासाठी कारखाना कपात करूनच ऊस बिले दिले जातात. परंतुआगीत झालेल्या नुसकाना चे कारखान्याने ऊस कपात करू नये अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments