Daily Mahasatta

Daily Mahasatta

आ. मानसिंगराव नाईक यांची यांची लोकलेखा व आमदार निवास समितीवर निवड

शिराळा (राजेंद्र दिवाण)
         महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा व आमदार निवास व्यवस्था समितीवर आमदार मानसिंगराव नाईक यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.
         या समिती बाबत माहिती देताना आमदार नाईक म्हणाले, लोकलेखा समिती ही राज्य विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे. विधिमंडळाच्या कामकाजात या समितीचे विशेष महत्त्व आहे. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षकांचा अहवाल यांचे परीनिरीक्षण करणे. राज्य सरकारच्या वित्तीय लेख्यांचे व त्यावरील लेखा परीक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे, राज्याची महामंडळे, व्यापार विषयक व उत्पादन विषयक योजना आणि प्रकल्प यांचे उत्पन्न व खर्च दाखवणारी लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्ट महामंडळ, व्यापारी संस्था किंवा प्रकल्प यांना भांडवल पुरविण्यासंदर्भात नियमन करणाऱ्या वैधानिक नियमांच्या तरतुदीअन्वये तयार केलेला ताळेबंद व नफा-तोट्याच्या लेख्यांची विवरणे व त्यावरील नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणे, राज्यपालांनी कोणत्याही जमा रक्कमांची लेखा परीक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षकांना निर्देशित असेल, त्या अहवालाचे परीक्षण करणे ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्ये आहेत.
        ते म्हणाले, माजी वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री आशिष शेलार यांचा समावेश असून एकूण वीस सदस्यांची ही समिती आहे. आमदार निवास व्यवस्था समिती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून त्यामध्ये एकूण बारा सदस्य आहे

Post a Comment

0 Comments