Daily Mahasatta

Daily Mahasatta

दिवाळीची कपडे खरेदी आता फक्त ढालगावाच्या ' स्वराज कलेक्शन ' मध्येच

: ढालगावच्या स्वराज कलेक्शन मध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी

कवठेमंहकाळ ( अभिषेक साळुंखे)

ढालगाव ( ता . कवठेमहांकाळ ) परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या व ग्राहकांना आपुलकीची सेवा देणाऱ्या ढालगाव नगरीतील सर्वात मोठे वस्त्रदालन असलेले स्वराज कलेक्शन मोठ्या दिमाखात दीपावली खरेदीसाठी सज्ज झाले आहे . ढालगाव येथील स्वराज कलेक्शनच्या ' स्वराज महोत्सवास ' अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे एमएसईबी रस्त्यावर ग्रामीण भागातील अद्ययावत ' स्वराज कलेक्शन'चे वस्त्रदालन अजितराव खराडे यांनी सुरू केले आहे . ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद व मागणीमुळे विस्तारित वस्त्रदालनाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला . ' गुणवत्तेची हमी व दरपण कमी' या घोषणेमुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून , दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे .

बुधवार दि . ११ नव्हेबंर ते ३१ डिसेंबरअखेर स्वराज महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या एक हजार रुपयांच्या कपडे खरेदीवर एक भाग्यवान कुपन देण्यात येत आहे. दोन हजार , चार हजार , सात हजार व ९९९९ च्या खरेदीवर हमखास भेटवस्तू अशी ग्राहकोपयोगी योजना सध्या सुरू आहे . आम्ही कपड्याबरोबर विश्वास देत आहोत. तरी ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजितराव खराडे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments