Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात स्वच्छतेचा महोत्सव, एकाचवेळी शहरात १२ सभा संपन्न

 : नगरपरिषदेचे उत्कृष्ट नियोजन
: विटेकरांचा उत्फूर्त प्रतिसाद
विटा (प्रतिनिधी)
       स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत विटा शहरातील एकूण १२ वॉर्ड मध्ये पालिकेने स्वच्छता जनजागृती सभांचे उत्कृष्ट नियोजन केले. सर्व प्रभागातील सभांमध्ये विटेकरांनी तसेच प्रभागातील मंडळे, संस्था, बचत गटांनी उत्फूर्त सहभाग घेत सभा यशस्वी केल्या.
        स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विटा शहरात एकाच वेळी संपूर्ण बारा प्रभागांमध्ये स्वच्छता जनजागृती बाबत सभांचे आयोजन विटा शहरातील नागरिक संस्था तसेच पालिकेच्या वतीने करण्यात आले याअंतर्गत विटा शहरातील एकूण 12 वार्ड मध्ये स्वच्छता जनजागृती सभांनी शहरात स्वच्छतेचे नवे पर्वच निर्माण झाले.
         विटा शहर स्वच्छतेसाठी सर्व प्रभागातील नगरसेवक पालिकेचे वॉर्ड ऑफिसर तसेच रहिवाशी नागरिकांनी एकत्र येऊन विटा शहर स्वच्छता मध्ये देशात अव्वल करण्याचा निर्धार केला ही विटेकर यांची एकी आदर्शवत आहे स्वच्छता हा संस्कार ठरवत विटेकर स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये आपल्या शहराला अव्वल करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत
सर्वच सभांमधून विटा शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशपातळीवरही पहिला क्रमांक मिळवून देण्याचा निर्धार करत शहर स्वच्छ व सुंदर बनवण्याचा संकल्प विटेकरांनी केला. स्वच्छता ही लोक चळवळ होण्यासाठी आजपर्यंत आपण सर्वांनी अनमोल असे योगदान दिले आहे आपल्या प्रभागांमध्ये दैनंदिन स्वच्छता तसेच नगरपालिकेच्या घंटागाडी मध्ये आपण दररोज ओला सुका व घातक कचरा देत आहोत यापुढेही आपण वर्गीकृत कचरा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. "शहर स्वच्छता" हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
         स्वच्छता हा संस्कार म्हणून आपण सर्वजण शहर स्वच्छतेमध्ये योगदान देत आहात. आपल्या विटा नगरीचे स्वच्छतेचे ब्रॅड ॲम्बेसिडर माजी नगराध्यक्ष ॲड वैभव दादा पाटील व नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील उपनगराध्यक्ष ॲड अजित गायकवाड मुख्याधिकारी अतुल पाटील तसेच सर्व पालिका पदाधिकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान आपल्या शहरांमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे. स्वच्छता जनजागृती सभेच्या माध्यमातून कचरा विलगीकरण घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती शंभर टक्के प्लास्टिक बंदी तसेच परिसर स्वच्छता परिसरातील पाणवठे स्वच्छता सार्वजनिक ठिकाणे सुशोभीकरण बांधकामाचा राडारोडा व्यवस्थापन यासह केंद्रशासनाच्या स्वच्छता ॲप चा वापर व उपयोग इत्यादी विषयावरती सखोलपणे मार्गदर्शन विविध सभां मध्ये करण्यात आले.

.

Post a Comment

0 Comments