Daily Mahasatta

Daily Mahasatta

उद्योजकांची वीज बिलाच्या दंडातून सुटका : सतीश मालू

 : महाराष्ट्र राज्य विद्युत नियमन समितीचा निर्णय

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)

एप्रिल, मे या दोन महिन्यांत मार्च २०२० पूर्वी पेक्षा उद्योगांच्या वीज वापरापेक्षा २५ टक्केहून कमी वीजेचा वापर झाला असेल तर त्या सर्व युनिटना के. व्ही. ए. एच. पेनल्टी व पी. एफ. पेनल्टी चा परतावा द्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य विद्युत नियमन समितीने दिला असल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व कुटुंब प्रमुख शिवाजी पाटील यांनी दिली.

राज्यात मार्च ते एप्रिल २०२० या लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्यातील सर्वच उद्योग बंद होते. बंद कालावधीत महावितरण कंपनीने उद्योजकांना कोट्यवधी रुपयांची वाढीव बिले पाठविली होती. या वाढीव बिलाबाबत कृष्णा व्हॅली चेंबरने महाराष्ट्र राज्य विद्युत नियमन समितीकडे १४३/२०२० नुसार याचिका दाखल केली होती. त्यानुसार समितीने २३ ऑक्टोबर रोजी मुंबईत सुनावणी ठेवली होती. या सुनावणीवेळी प्रताप होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व कुटुंब प्रमुख शिवाजी पाटील, वकील शेखर करंदीकर यांनी उद्योजकांच्या वतीने बाजू मांडली.

राज्यात कोरोना महामारी संकटाने थैमान घातले होते. शासनाने या महामारीवर मात करण्यासाठी मार्च ते एप्रिल या महिन्यात राज्यात लाॅकडाऊन घोषित केले होते. या कालावधीत राज्यातील सर्वच उद्योग बंद होते. तरीही महावितरण कंपनीने बंद कालावधीतील उद्योगांची उद्योजकांना लाखों रुपयांची वाढीव बिले पाठविली. त्यामुळे उद्योजक हतबल झाले होते. उद्योजकांचा विचार करून कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने वाढीव वीज बिलाबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत नियमन समितीकडे याचिका दाखल केली होती.

कोरोनामुळे के. व्ही. ए. एच. बिलींग १ वर्षे स्थगिती करावी. त्यावरील पेनल्टी रद्द करण्यात यावी व पाॅवर फॅक्टर पेनल्टी सुध्दा रद्द करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार समितीने दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकून घेतले होते. एप्रिल व में महिन्यात उद्योजकांनी मार्च २०२० पूर्वी च्या वीज वापरापेक्षा २५ टक्क्याहून वीजेचा कमी वापर झाला असेल तर त्या सर्व युनिटना के. व्ही. ए. एच. पेनल्टी व पी. एफ. पेनल्टीचा परतावा महावितरण कंपनीने उद्योजकांना द्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य विद्युत नियमन समितीने दिला आहे. या निर्णयामुळे उद्योजकांची वीज बिलाच्या मोठ्या दंडातून सुटका होणार असल्याचे मालू व पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments