Daily Mahasatta

Daily Mahasatta

पदवीधर मतदार संघातून आपला विजय निश्चित : संग्रामसिंह देशमुख

विटा (प्रतिनिधी)
       भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवत आपल्याला उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातून आपला विजय निश्चित आहे, असे मत भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 
        केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मोठे काम केले आहे. हे काम पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण स्वतः युवक आहोत. युवक, पदविधरांचे प्रश्न माहीत आहेत. या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. यापूर्वीच संपूर्ण मतदारसंघात संपर्क आहे. आता जबाबदारी वाढणार आहे. कार्यकर्ते, पक्ष संघटना आणि व्यक्तिगत संपर्क, नेत्यांचे पाठबळ यामुळे विजय मिळेल, याची खात्री आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे पदवीधर मतदारसंघात उमेदवारी घोषित झालेली सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments