Daily Mahasatta

Daily Mahasatta

माणुसकीला काळीमा, १३ दिवसाच्या बाळाचा खून


पलूस ( अमर मुल्ला)
        अवघ्या १३ दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात बालकाचा अज्ञात माथेफिरु ने पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याची  घटना पलूस तालुक्यातील माळवाडी येथे आज बुधवारी सकाळी घडल्याचे उघडकीस आले आहे.  याबाबत उत्तम माळी  यांनी भिलवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
     माळी यांचा माळवाडी वसगडे रस्त्यालगत  शेतातील वस्तीवर साईदीप नावाचा बंगला आहे. सकाळी घरातील सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. त्यांची मुलगी ऐश्वर्या अमित माळी ही 13 दिवसाच्या बाळासोबत बेडरूममध्ये झोपली होती. तर  तिची आई  व वहिनी या दोघी शेतात काम करत होत्या. काही वेळाने  ऐश्वर्या घराबाहेरील बाथरूम मध्ये गेली.
       त्यानंतर ऐश्वर्या परत आली तेंव्हा बाळ जागेवर नव्हते. बाळ गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या हिना सर्वांना बोलावून घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. सर्वत्र शोधाशोध घेतली तरी बाळ सापडत नव्हते. शेवटी  शंका आल्याने काहीजणांनी गच्चीवरील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडले असता त्यामध्ये बाळाचा मृतदेह तरंगताना दिसून आला.
याबाबत भिलवडी पोलिस ठाण्यात वर्दी देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
       अवघ्या तेरा दिवसाच्या नवजात बालकाचा मारेकरी कोण ? याची भिलवडी पोलीस याबाबत कसून तपासणी करत आहेत. मात्र माणुसकीला काळीमा फासणार्या या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरुन गेला आहे. 


 

Post a Comment

0 Comments