कर्मवीर पतसंस्थेने तत्पर ग्राहक सेवेतून वेगळेपण जपले आहे : रावसाहेब पाटील

: कर्मवीर पतसंस्थेच्या मालगांव शाखेचे उद्घाटन
: ४१ शाखेच्या माध्यमातून कार्यविस्तार

सांगली ( राजाराम पाटील)
        : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या ४१ व्या मालगांव
शाखेचे उद्घाटन मालगांव येथील जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. स्वागत संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी केले.
        पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहीती दिली. त्यांनी
संस्थेच्या सांपत्तीक स्थितीची माहिती दिली. संस्थेचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून
संस्थेच्या ठेवी ४६० कोटी आहेत. संस्थेने रुपये ३५० कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल २१ कोटी असून स्वनिधी ४५ कोटी आहे. संस्थेचे खेळते भांडवल ५४० कोटी आहे.
        संस्थेची सभासद संख्या ३२००० आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ असून नेट एनपीए शुन्य टक्के आहे. सभासदांशी त्यांनी वेगवेगळया विषयावर मनमोकळा संवाद साधला. सभासदांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी सभासदांनी देखील स्थानिक संस्थाच ग्राहकांना चांगली, नम्र सेवा देत असल्याचे सांगितले. यावर भाष्य करताना रावसाहेब पाटील यांनी आमची चांगली ग्राहक सेवा देण्यावरच भर असून ते आमचे बलस्थान आहे. त्यातून संस्थेने सेवेमध्ये वेगळेपण निर्माण केल्याचे सांगितले. संस्था सभासदांच्या हिताच्या दृष्टीने वाटचाल करीत असल्याने संस्थेचा नावलौकीक वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. या कोरोनाच्या पार्श्वभीवर कर्मवीर संस्थेने महाराष्ट्रात सर्वात प्रथम लाभांश वाटप केल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
       
या प्रसंगी मालगांव येथील अशोक नामगोंडा पाटील, खंडेराजुरी सोसायटीचे चेअरमन नितीन दादासो कागवाडे, सतिश भरतेश्वर बागणे, शशिकांत कनवाडे यांचे सह माजी जि.प. सदस्य शिवाजी रुपणुर, सोसायटी सदस्य आदिनाथ चौगुले. माजी सरपंच बाहुबली पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सुंगारे शिवाजी कदम, विजय चौगुले, विद्याधर शेडबाळे पंकज बाहेती, कलगोंडा कोले, अविनाश कोले उपस्थित होते.
        या कार्यक्रमास संस्थेचे संचालक ॲड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे, डॉ रमेश ढबू, ओ. के. चौगुले, लालासो थोटे, वसंतराव नवले, सौ. ललिता सकळे, यांच्यासह, विविध संस्थांचे पदाधिकारी, संस्थेचे सभासद, सेवक व नागरीक उपस्थित होते. आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांनी मानले.

Post a comment

0 Comments