Daily Mahasatta

Daily Mahasatta

सार्वभौमिक मानवाधिकार परीषद उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे


पलूस (अमर मुल्ला)

       सार्वभौमिक मानवाधिकार परिषद, राज्यस्थान (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष मा. तरुण बाकोलिया जी मानवाधिकार परीषद राष्ट्रीय महासचिव मनिष नेरुरकर यांनी केली आहे.

     यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हजर होते. पदाधिकारी यांनी काय काय काम करायचे? याबाबतचे मागदर्शन करण्यात आले. मानवाधिकार, स्वरंक्षण, अपराध नियंत्रण, पर्यावरण संरक्षण, समाजातील वाढता भ्रष्ठाचार रोखणे, भ्रूण हत्या बाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, बाल विवाह व बाल मजुरी रोखणे याबाबत प्रबोधन करणे, अन्याय ग्रस्त लोकांना मदत करणे, अन्न पदार्थ. खाद्य पदार्थ यात होणारी भेसळ रोखणे. समाजात जागृती करणे. एड्स बाबत माहिती देणे. सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्काबाबत माहिती देणे. वृक्ष रोपण. रक्तदान. शिबीर आयोजित करणे याबद्दल सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला सुहास सावर्डेकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष), दत्तात्रेय पवार सांगली जिल्हा अध्यक्ष, शब्बीर अत्तार (जिल्हा उपाध्यक्ष) वसंत मोहिते (जिल्हा उपाध्यक्ष), श्रीमती मनीषा राजेंद्र राऊत (सांगली जिल्हा महिला अध्यक्ष), संगीता मेटकरी (आटपाडी ब्लॉक अध्यक्ष) व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी यांचे स्वागत गजानन शिंदे यांनी केले. आभार मनीषा राऊत यांनी मानले.

Post a Comment

0 Comments