Daily Mahasatta

Daily Mahasatta

बारा तासात चोरटे जेरबंद, कुपवाड पोलिसांची कामगिरी

कुपवाड (प्रमोद अथणीकर)
कुपवाड येथील बस स्टँड शेजारी असणाऱ्या एका किराणा दुकानांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. त्याचा छडा बारा तासात लावून कुपवाड पोलिसांची दमदार कामगिरी केली आहे.विजय राजू मस्के (वय २३) रा. रेवणी गल्ली मिरज आणि अदनान अब्दुलगणी मुल्ला (वय २९) रा. स्टेशन रोड मिरज

अधिक माहिती अशी, कुपवाड परिसरात गावभागात असणारे लक्ष्मी किराणा स्टोअर मधून शुक्रवारी च्या रात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्याने 32 हजार 800 रुपयाची रोकड व चांदी ची नाणी असा एकूण 67 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास करून चोरट्याने पलायन केल्याची फिर्याद दुकान मालक राजेंद्र बसगोंडा पाटील (रा. कुपवाड) यांनी दिली होती.

याची दखल घेऊन कुपवाड पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक निरज उबाळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी जोरदार यंत्रणा लावून अवघ्या 12 तासात चोरट्यांच्या मुसक्या अवळल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कामगिरीबद्दल कुपवाड पोलिसांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments