एसटी बस - सुमोचा भीषण अपघात, जतचा एक ठार

 
कडेगाव  ( सचिन मोहिते)

(वांगी) तालुका कडेगाव येथे सुमो व मालवाहतूक एस . टी . चा भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत. जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, टाटा सुमो गाडी (नंबर एम .एच .१६ ए . जे . ६८२५) ही गाडी वांगी मार्गे कडेपुरकडे निघाली होती तर कवठे मंहाकाळ डेपोची एस .टी . मालवाहतूक गाडी नंबर (एम . एच . ४० .एन . ८३५९) ही एस .टी. कडेगाव एमआयडीसी मधून लोखंड घेऊन सांगलीकडे निघाली होती . सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास टाटा सुमो व एस .टी ची वांगी येथील पुष्पदिप पेट्रोलपंपाच्या नजीक समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भिषण होती की सुमो गाडीच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. तर एस. टी. बसचे सुद्धा पुढील बाजुचे चाक तुटले असून मोठे नुकसान झाले आहे .

सुमो गाडीचा चालक सदाशिव केराप्पा कुराळ ( वय ३० ) राहणार कृष्णानगर आष्टा , मूळ गाव माडग्याळ तालुका जत हा जागीच मयत झाला असून अर्जुन भीमराव शिंदे व यशवंत सरगर दोघेही रा. आष्टा हे जखमी झाले आहेत. तसेच एस. टी चालक यांना पायाला किरकोळ जखम झाली आहे. जखमीना हॉस्पीटल मध्ये दाखल केले आहे.

पुढील तपास चिंचणी वांगीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करत आहेत .

Post a comment

0 Comments