कडेगाव तालुक्यात वाळू तस्करांना मोठा दणका, वाळूचे चार ट्रॅक्टर जप्त

नेर्ली/कडेगाव (संदीप कुलकर्णी)
       
येरळा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यास उच्च न्यायालयाची बंदी असतानाही आदेश मोडीत काढून नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केली जाते. यावर तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वांगी - शेळकबाव नदीपात्रात उतरून चार वाळूने भरलेले ट्रॅक्टर व 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

          या कारवाईत एक जेसीबी मशीन सापडले होते. परंतु तस्करांनी ते पळवून नेले. महसूल विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. मागील महिन्यात महसूल विभागातर्फे नदीपात्रात कडे जाणारे रस्ते पूर्णपणे चरी काढून बंद करण्यात आले होते. परंतु वाळू तस्करांकडून पुन्हा एकदा त्या चरी मुजवून वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असल्याची बातमी तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांना मिळाली.

          डॉक्टर शैलजा पाटील यांनी शुक्रवारी पहाटे वांगी शेळगाव नदीपात्रात उतरून दोन किलोमीटर पायपीट करून ही मोठी कारवाई केली. या कारवाईत वांगी तलाठी राजेश चौरे, कोतवाल संजय कदम तसेच अव्वल कारकून महेंद्र जगताप यांनी सहभाग घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉक्टर शैलजा पाटील म्हणाल्या की वाळू तस्करी बाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. तलाठी व प्रशासनास तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

यापुढेही ही कारवाई अधिक कडक केली जाईल. तसेच यात कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्याप्रमाणे वाळू तस्करी करणे हा गुन्हा आहे. त्याचप्रमाणे चोरीची वाळू खरेदी करणे हा हि गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही चोरीची वाळू खरेदी करू नये, असे आवाहन तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांच्याकडून करण्यात आले

Post a comment

0 Comments