Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नोंदणीवर संशय घेऊन जयंतरावांनी पराभव मान्य केला : देवेंद्र फडणवीस

पुणे ( प्रतिनिधी)
पदवीधर मतदार संघात बोगस नोंदणी झाली असल्याचा आरोप करून जयंत पाटील यांनी या मतदार संघात आपला पराभव मान्य केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदवीधर मतदार संघात बोगस नोंदणी झाली असल्याचा आरोप केला असल्याचे विचारल्यावर त्यांनी याबाबत उत्तर दिले.

ते म्हणाले, असा आरोप करून जयंतरावांनी पराभव मान्य केला आहे, पराजय डोळ्यासमोर दिसायला लागला की कव्हर फायरिंग केलं जातं, तोच हा प्रकार आहे, पदवीधर नोंदणीचा टक्का आधीच कमी असतो. याची नोंदणी करण्याची प्रक्रिया देखील कठीण आहे.

या निवडणुकीत पराभवाचे खापर फोडण्यासाठी या निवडणुकीत ईव्हीएम नाही, म्हणून आता बोगस मतदार नोंदणी करीत असल्याचे सांगत आहेत.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका सुरू आहेत. संग्राम देशमुख आणि भाजपला प्रचंड प्रतिसाद मला तीन जिल्ह्यातील दौऱ्यांमध्ये पाहायला मिळाला. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उत्साहाने कामाला लागले आहेत.

सरकरच्यांविरोधात मोठा असंतोष आम्हाला पाहायला मिळतोय, हा असतोष संघटित होऊन पदवीधर आम्हाला संधी देतील असा विश्वास वाटतोय, पहिल्याच फेरीत संग्राम संपतराव देशमुख विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिक्षक मतदार संघात शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. आताचा प्रतिसाद बघता यावर्षी गतवेळचे अपयश पुसून जाईल. शिक्षकांच्या पगाराच्या तारखा आणि इतर प्रश्नामुळे शिक्षक अडचणीत आहेत, याचा रोष आहे.
कोरोना मध्ये व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टी मध्ये राज्य सरकारचा नाकर्तेपणा पाहायला मिळयला.
वीज बिलाबाबत घुमजाव केला. सरकार मध्ये समनव्य नाही. कुरघोड्यामध्ये लोकांचे हाल होत आहेत. गेल्या एक वर्षात या सरकारची कोणतीही उपयुक्तता नाही. मला विश्वास आहे या सरकारच्या विरोधातील रोष मतदार या निवडणुकीत दाखवतील.
अनैसगिक सरकार फार काळ चालू शकत नाही, हा इतिहास आहे. आम्ही हे सरकार पडावं असे डोळे लावून बसलो नाही. पण ज्या दिवशी हे सरकार अपयशी ठरेल त्यावेळी आम्ही सक्षम सरकार जनतेला नक्कीच देऊ. असेही ते यावेळी म्हणाले.

Post a comment

0 Comments