Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील सौ. विमलताई जाधव यांचे निधन

विटा (प्रतिनिधी )
        शिवसेनेचे
विटा शहर प्रमुख मा. सुधीर उर्फ राजू जाधव यांच्या मातोश्री सौ. विमलताई तुकाराम जाधव (वय -७२ रा. हणमंत नगर, विटा, मुळ गाव - पळशी) यांचे काल शनिवार ता. ३१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
        सौ. विमलताई जाधव या रयत शिक्षण संस्थेच्या माहुली येथील अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य तुकाराम जाधव यांच्या पत्नी होत. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. शनिवारी सायंकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. विटा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शांत, संयमी स्वभावाच्या विमलताई यांचे हणमंत नगर, पंचशील नगर आणि परिसरातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
       कै. सौ. विमलताई जाधव यांच्या पश्चात पती माजी प्राचार्य तुकाराम जाधव, मुलगा सुधीर उर्फ राजू जाधव आणि सचिन जाधव तसेच दोन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दैनिक महासत्ता आणि महासत्ता महासत्ता सांगली न्यूज पोर्टलच्यावतीने कै. विमलताई तुकाराम जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

Post a Comment

0 Comments