पंढरपूर (प्रतिनिधी)
: पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांनि अखेरचा श्वास घेतला. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला आणि उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
आमदार भालके यांना काही दिवसापुरवी कोरोंना झाला होता. नंतर ते बरे होवून घरी देखील गेले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.
आमदार भालके यांनी 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली होती. पंढरपूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना पराभूत केले होते. आमदार भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर मतदारसंघासह राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
must read
पदवीधर निवडणूकीत कोण कोणासोबत हे कळेलच : राज्यमंत्री विश्वजीत कदम
ऊस वाहतूकदाराची १० लाखांची फसवणूक
शेतकऱ्यांना वीज कनेक्शन बाबत वाट पहावी लागणार नाही : राज्यमंत्री विश्वजीत कदम
0 Comments