Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील वॉर्ड क्र. 2 मध्ये स्वच्छता श्रमदान मोहीम सपंन्न

: आदर्शनगर परिसरातील महिलांचा स्वच्छता श्रमदानात सहभाग

विटा ( प्रतिनिधी )

       
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विटा नगरपालिकेच्या वतीने व आदर्श नगर येथील रहिवासी नागरिकांनी स्वच्छता श्रमदान अभियान घेऊन परिसर स्वच्छ व सुंदर केला. आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी स्वच्छता श्रमदान अभियान घेऊन परिसरातील रस्ते, रिकाम्या जागा ,सार्वजनिक ठिकाणे तसेच परिसरातील सर्व भाग स्वच्छ करत आदर्श नगर येथील तसेच वार्ड क्रमांक दोन मधील नागरिकांनी शहर स्वच्छतेचा वसा जोपासला.
स्वच्छ सर्वेक्षण च्या माध्यमातून विटा शहराला देशामध्ये पहिला क्रमांक मिळवून देण्यासाठी वार्ड क्रमांक दोन मधील नागरिकांनी परिसर स्वच्छतेचा निर्धार करत स्वच्छता श्रमदान अभियान यशस्वी केले.
          यावेळी सौ. प्रतिभा चोथे म्हणाल्या, विटा नगरपालिका गेली तीन वर्ष स्वच्छतेसाठी फार महत्त्वाचे काम करत आहे. विटा नगरपालिकेच्या बरोबर शहरातील नागरिकांनी शहर स्वच्छतेमध्ये फार मोलाचे योगदान दिले आहे. या अनुषंगाने आज वार्ड क्रमांक दोन मधील सर्व रहिवासी नागरिक, तसेच महिला, तरुण युवक सर्व संस्था, बचत गट यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
          स्वच्छतेचे ब्रँड अँबेसिडर ॲड वैभव पाटील, नगराध्यक्ष सौ प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष ॲड अजित गायकवाड, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान अभियान घेण्यात आले. यामध्ये माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, माजी शिक्षण सभापती अविनाश चोथे यांनी श्रमदान मोहीमेत योगदान दिले.
         यावेळी वॉर्ड ऑफिसर महेश गायकवाड , शरद बोडरे , दिनेश साबळे, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत तसेच नगर परिषद कर्मचारी व परिसरातील नागरिक श्री ब्रम्हदेव बाबर , माजी लेखपाल प्रभाकर आप्पा कवडे , भुपाल लोंढे , सौ प्रियांका कवडे , सौ कल्याणी लोंढे , सौ प्राजक्ता कवडे , सौ स्वाती खेडकर , सौ गिता पांडकर , सौ पल्लवी तारळेकर , श्री संतोष रेपाळ, राजु कलढोणे, अशोक तारळेकर, विनोद कवडे, सुहास पांडकर, शेखर लोंढे, प्रशांत कवडे , मेघा तारळेकर , वैशाली कलढोणे, मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले
---------------------------

Post a Comment

0 Comments