Daily Mahasatta

Daily Mahasatta

आत्मशक्ती पतसंस्थेत 2 कोटी 94 लाख ठेव संकलन

पेठ (रियाज मुल्ला )

पेठ ता. वाळवा येथील आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत दीपावली पाडव्यानिमित्त 2 कोटी 94 लाख रुपये ठेव संकलन झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील यांनी दिली .

पारदर्शक कारभार व ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागात कार्यरत असणारी आत्मशक्ती पतसंस्था बंदीच्या व कोरोनाच्या काळात भक्कम पणे उभी राहिली. स्वर्गीय हणमंतराव पाटील यांच्या प्रेरणेने आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्यादित पेठ ही या ग्रामीण भागात वेगळा ठसा उमटवून संस्थेची यशस्वी घोडदौड चालू आहे. यामध्ये सभासद, ग्राहक , हितचिंतक या सर्वांच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळे संस्थेचे वाढ होत आहे. यामध्ये सर्व संचालक, कर्मचारी, पिग्मी एजंट यांचा सहभाग असलेने वरील ठेव जमा झाली.

याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन अंबादास पेठकर , व्हा. चेअरमन शेखर बोडरे,संचालक प्रदीप पाटील, महादेव पाटील, अरुण कदम, संजय पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. मुसाअल्ली जमादार ,धनपाल जाधव, जयवंत जाधव ,संचालिका अरुणा पाटील, मंगल पाटील, प्रमोद सांभारे व सचिव कृष्णात दाभोळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments