Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पेठ परिसरात अरुण लाड यांच्या प्रचाराचा धडाका, 11 गावात राष्ट्रवादीच्या बैठका

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ ता. वाळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदवीधर संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड यांच्या प्रचारार्थ पेठ व पेठ परिसर भागातील 11 गावातील पदवीधर मतदार राजाची गावनिहाय भेट घेत प्रचारात आघाडी घेतली आहे.

पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मा. श्री अरुण गणपती लाड यांच्या प्रचारार्थ पेठ व परिसरातील सर्व पदवीधर मतदार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक युवा नेते अतुल पाटील ( बापू) यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या वेळी विजय पाटील,सपंत पाटील, शिवाजी खापे,शहाजी पवार, तुळशीदास पिसे, संग्राम कदम, सुभाष भांबुरे, हेमंत पाटील, रामसिंग वारके,पिंटू चव्हाण, रविकिरण बेडके, विकास जानकर,अमोल भांबुरे, जनार्दन माळी, तसेच राजाराम बापू उद्योग समूहाचे कर्मचारी उपस्थित होते.

तसेच नायकलवाडी , महादेव वाडी, माणिक वाडी, याठिकाणी ही युवानेते अतुल पाटील बापू, व संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी संजय नायकल, सुनिल कचरे, नामदेव मोहिते, संजय नायकल, सुनिल कचरे, नामदेव मोहीते, रामभाऊ मोहिते, दिनकर शिंदे, संजय शिंदे ,विलास शिंदे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments