Good news खानापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढीला ब्रेक, सर्वांची दिपावली ' हॅप्पी ' होणार

विटा ( मनोज देवकर )
        विटा शहरासह खानापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आटोक्यात आणण्यात प्रशासनाला चांगले यश आले आहे. त्यामुळे गेल्या सात आठ महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 
कोरोनाग्रस्तांची संख्या घटल्यामुळे बाजारपेठेत देखील उत्साहाचे वातावरण आहे. 
        आज खानापूर तालुक्यात 17 रुग्णांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. पारे येथील 4 व खानापूर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह असून एकट्या विटा शहरात 12 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पारे येथील चार ही रुग्ण एकाच घरातील आहेत. नेलकरंजी येथील 70 वयाची एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. मृतांची संख्या 56 वर पोहचली असून 508 रुग्णांवर तालुक्यात उपचार सुरू आहेत. 
      रुग्णांची संख्या कमी झाल्याने तालुक्यातील काही कोविड सेंटर्स बंद करण्याच्या विचारात प्रशासन असल्याचे समजते. अर्थात कोरोनाग्रस्तांची संख्या अशीच कमी झाल्यास यावर्षीची दिपावली सर्वांनाच ' हॅप्पी ' जाणार असल्याचे शुभसंकेत मिळत आहेत.

Post a comment

0 Comments