Daily Mahasatta

Daily Mahasatta

Good news सांगली जिल्ह्यात कोरोना वाढीला ब्रेक

: आज ३४३ पाॅझीटीव्ह तर ६६० कोरोनामुक्त

सांगली (राजेंद्र काळे )
        सांगली जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून दररोजच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्या संख्येत वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र पहायला मिळत आहे. आज सोमवार ता. ५ रोजी ३४३ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर यापेक्षा जादा म्हणजेच ६६० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
         सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू होती. मात्र गेल्या दहा दिवसात ही वाढ आटोक्यात राहिली आहे तर कोरोनामुक्त होणार्या रुग्णाच्या संख्येत दिलासादायक वाढ होत आहे. आज सोमवार ता.५ रोजी ३४३ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात ६६० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज सांगली महापालिका क्षेत्रात ६२ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर ४९ तर मिरज शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- २१, जत -१४, कडेगाव - २४ कवठेमंकाळ -२०, खानापूर - ३२, मिरज- २८, पलूस- २७ शिराळा- १४, तासगाव- ३५आणि वाळवा -६६ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
तर सांगली जिल्ह्यात आज २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments