Daily Mahasatta

Daily Mahasatta

लॉकडाऊन नंतर आठ महिन्याने भरला आटपाडीचा प्रसिद्ध शेळ्या - मेंढ्यांचा बाजार

आटपाडी (नंदकुमार कोळी)
        कोरोना महामारीच्या संकटातून सावरून तब्बल साडेसात ते आठ महिन्यांनंतर आटपाडी शहरातील प्रसिद्ध शेळ्या मेंढ्यांच्या बाजार आज पुन्हा एकदा भरला. बाजार समितीच्यावतीने या शेळ्या मेंढ्या बाजारासाठी विशेष नियोजनबध्द करण्यात आले होते.
          या विषयी अधिक माहिती देताना आटपाडी बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव म्हणाले, आम्ही बाजार समितीच्या दोन्ही गेट वर प्रत्येकी दोन कर्मचारी उभे केले होते व नो मास्क नो एंट्री या नुसार आमचे कर्मचारी कोणालाही विना मास्क बाजार समितीच्या आवारात प्रवेश करू देत न्हवते . तसेच दोन्ही गेटवर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते.
        सर्व बाजारातून सोडियम हायड्रोक्लोराइन ची फवारणी करण्यात येत होती. ज्यामुळे बाहेर गावातून आलेली वाहने व शेळ्या मेंढ्या यांच्या पासून संसर्गाचा धोका टाळता येईल. बाजार समितीने शेळ्या आणी मेंढ्या यांच्या साठी दोन वेगवेगळे विभाग करून बाजार भरवला होता , आणि यासाठी युनिट १मध्ये शेळ्या व बोकड खरेदी विक्री साठी ठेवले होते व या युनिट १ चे व्यवस्थापन बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांच्याकडे व युनिट २चे व्यवस्थपण सहाय्यक सचिव श्री नारायण आयवळे यांच्याकडे होते. युनिट २ मध्ये मेंढ्या खरेदी विक्री साठी ठेवले होते.
          या लॉकडाऊन नंतर चा पहिल्याच बाजारात एकूण ५००० ते ५५०० अशी शेळ्या मेंढ्यांची आवक झाली होती व त्यातून २५०० शेळ्या व बोकड यांची आवक होती तर ३०००मेंढ्यांची आवक झाली होती . यापैकी १६०० शेळ्या मेंढ्यांची विक्री या बाजारातून झाली असून अंदाजे ७०ते ८० लाख रुपयांची उलाढाल आज रोजी या बाजारातून झाली आहे असे श्री शशिकांत जाधव यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात आटपाडी बाजार हा शेळ्या मेंढ्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असून या बाजारात आजू बाजूच्या जिल्ह्यातून म्हणजेच सातारा, सोलापूर जिल्ह्यातून पशुपालक आपल्या शेळ्या मेंढ्या विक्री साठी घेऊन आले होते त्यामुळे या बाजार ला अनन्यसाधारण महत्त्व आहे .
       या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारा मूळे ऐन सणसुदीच्या दिवसात शेतकरी वर्गाकडून चार पैसे येण्याचे साधन चालू झाल्या मुळे शेतकरी वर्गातून या बाजार समितीचे कौतुक केले जात आहे. 

Post a Comment

0 Comments