विट्यातील जनता कर्फ्यू मध्ये बदल, दसरा व दिवाळीचा सण आल्याने निर्णय : वैभव पाटील.

विटा (मनोज देवकर )

          विट्यातील कोरोनाग्रस्तांचा संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरले होते. मात्र आता दसरा आणि दिवाळीचा सण आल्याने रविवार चा जनता कर्फ्यू रद्द करुन नागरिकांनी आपले व्यवहार सुरू ठेवावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले आहे.

        वैभव पाटील यांनी म्हटलं आहे, सर्व विटेकर नागरिक व व्यावसायिकांचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करु इच्छितो. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विट्यामध्ये मी आपणाला ज्या ज्या वेळी जनता कर्फ्यू किंवा वेळेच्या संदर्भामध्ये आवाहन केले  त्यावेळी आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात वाढणाऱ्या कोरोनाला रोखण्याचा आपला प्रयत्न यशस्वी ठरत आहे. अशीच एकी आपण पुढील काळामध्ये ही राखुया आणि येणाऱ्या संकटाचा मुकाबला करूया.

      सप्टेंबर महिन्यात 9 तारखेपासून 17 तारखेपर्यंत आपण जनता कर्फ्यू पाळला व त्यानंतर आपण सर्वांनीच ठरवले होते की सकाळी 9 वाजल्यापासून ते  सायंकाळी 5 वाजेपर्यंत विटा सुरू राहील याचे आपण सर्वांनीच पालन केले. आज पासून वेळेत बदल करून ही वेळ सायं 5 च्या ऐवजी सायं 7 वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. तसेच  दसरा व दिवाळीचा सण तोंडावर आला असलेने व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेने रविवारीच्या जनता कर्फ्यूला तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.  मात्र या काळात शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे यामध्ये सॅनिटायझरचा वापर, मास्क, सोशल डिस्टंशिंग, वारंवार हात धुणे इत्यादी बाबींचे पालन करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष ॲड वैभव सदाशिवराव पाटील यांनी केले आहे. 

 

Post a comment

0 Comments