Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना महामारीमुळे रखडलेली कामे मार्गी लावणार : तालुका अध्यक्ष विजय पाटील

वाळवा ( रहिम पठाण)
       कोरोना महामारीमुळे तालुक्यातील अनेक विकास कामे रखडलेली आहेत. ही विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. मसुचीवाडी ता. वाळवा गावातील विविध प्रश्न, समस्या समजावून घेऊन योग्य मार्ग काढण्यासाठी मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने संपर्क दौरा संपन्न झाला. यावेळी तालुका अध्यक्ष मा. विजय पाटील(बापू) बोलत होते.
       कोरोना महामारीमुळे गेले 8 -10 महीने तालुक्यातील गावामधील अनेक गोष्टी मार्गस्थ करने गरजेचे आहे हे जाणूनच या संपर्क दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील विविध विकास कामांची माहीती घेऊन लोकांच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली. गावातील अत्यावश्यक अशा सर्व विषयांची सोडवणूक कशा पध्दतीने करता येईल हे समजावून घेऊन त्याच बरोबर कोरोनाच्या सद्यस्थितीची माहीती घेतली गेली.
       संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे नुतन अध्यक्ष मा. संजय पाटील (बापू) वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संग्रामसिंह पाटील गावातील जेष्ठ नेते युवक सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments