Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात आज २९ पाॅझीटीव्ह

: विटा शहरात आज २२ नवीन रुग्ण

विटा ( मनोज देवकर)
      आज सोमवार ता. ५ रोजी खानापूर तालुक्यातील २९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . यामध्ये विटा शहरातील २२ तर ग्रामीण भागातील ६ व्यक्तींचा समावेश आहे. कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील एकजण पाॅझीटीव्ह आला आहे.
       खानापूर तालुक्यात आजपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १८६७ वर पोहचली आहे. त्यातील १२५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
खानापूर तालुक्यात कोरोनामुळे आजवर ५२ लोकांनी प्राण गमावले आहेत. सद्या ५५६ रुग्णांवर शासकीय , खाजगी कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृह विलगिकरण करण्यात येत आहे.
       कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विटा शहरामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. रविवारी विटा शहरात जनता कर्फ्यु चे पालन करण्यात येते. ग्रामीण भागात ही लोक मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करत आहेत. ग्रामीण भागात सोशल डिस्टन्स चे पालन करून रेशन दुकानदार धान्य वाटप करत आहेत. लोकांच्यात जागृती वाढल्याने कोरोना रुग्ण संख्या कमी होईल अशी लोकांना आशा वाटत आहे

Post a Comment

0 Comments