Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील ऐतिहासिक पालखी सोहळा रद्द

: पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची माहिती
विटा ( मनोज देवकर)
        सुमारे शंभरहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेली आणि महाराष्ट्रासह देशभरातील गलाई बांधव व भाविकांचे मुख्य आकर्षण असलेली विट्यातील ऐतिहासिक पालखी शर्यत यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी माहिती दिली आहे.
       विटा तहसिल कार्यालय येथे आगामी विजयादशमी दसरा पालखी शर्यत सोहळा 2020 चे अनुषंगाने मिटींग घेणेत आली. मिटिंग करीता प्रांत अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक विटा रवींद्र शेळके, माजी आमदार सदाभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील तसेच विटा नाथ मंदिर व मूळस्थान गुंफा सुळेवाडी रेवानगर  या या दोन्ही मंदिरातील पुजारी, विश्वस्थ, ट्रस्टीचे पदाधिकारी, तसेच पालखीचे मानकरी व पालखी शर्यतीत सहभागी होणारे भाविक असे 30 ते 35 सदस्य यांची मिटिंग सोशल डिस्टनसिंगचे पालन करून मिटिंग घेण्यात आली.
        मिटिंग मध्ये प्रशासनाचे वतीने दसरा पालखी शर्यत सोहळा रद्द करणेबाबत तसेच नवरात्र उत्सव निमित्त नाथ मंदिरांमध्ये होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करणेबाबत आवाहन करण्यात आले होते. सदर आव्हानाला माजी आमदार सदाभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील, विटा व मूळस्थान गुंफा सुळेवाडी रेवानगर येथील मंदिरातील पुजारी, पालखीचे मानकरी,ट्रस्टचे पदाधिकारी यांनी मान्य करुन कोरोना संसर्गजन्य  रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन चालू वर्षी  सालाबाद प्रमाणे होणारा नवरात्र उत्सव तसेच दसरा पालखी शर्यत सोहळा कार्यक्रम साजरा न करता फक्त साधे पद्धतीने पालख्यांची विधीवत पूजा करण्याचे ठरले आहे.
      त्यामुळे विटा शहरात विजयादशमी दसऱ्याचे अनुषंगाने होणारी ऐतिहासिक  पालखी शर्यत सोहळा  होणार नाही, असे जाहीर करून शासनाने केलेल्या आवाहनानुसार सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्वांना नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना देऊन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची दक्षता घेणेबाबत सूचना देण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे. 


 

Post a Comment

0 Comments