Daily Mahasatta

Daily Mahasatta

' आत्मशक्ती ' शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीमती अंजना पाटील

पेठ (रियाज मुल्ला)
       आत्मशक्ती समूहाचे संस्थापक अध्यक्ष कै. हणमंतराव पाटील यांचे आकस्मित निधन झालेमुळे रिक्त झालेल्या जागी त्यांच्या पत्नी श्रीमती अंजना पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दक्षिण भाग सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
        त्यांच्या सत्कार प्रसंगी युवा नेते अतुल पाटील, रामोशी कृती समिती महासंघाचे अध्यक्ष मोहन मदने, माजी सरपंच विजय पाटील,आत्मशक्ती पतसंस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील, ग्रा. प. सदस्य नामदेव कदम, वाळवा तालुका हॉटेल असोसिएशन चे अध्यक्ष फिरोज ढगे, प्रदीप पाटील, अभिजित पाटील, मोहन पाटील, दिलीप पाटील, सुमित पाटील, एम एस पाटील, अनिल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
       स्वागत प्रास्ताविक संस्थेचे सचिव सी एच पाटील यांनी केले तर आभार एस बी जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments