Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाच्या महामारीत सांगली महापालिकेचे काम उल्लेखनीय : राज्यमंत्री विश्वजित कदम


सांगली (प्रतिनिधी)
        कोरोनाच्या महामारीत सांगली महापालिकेच्या प्रशासनाने उल्लेखनीय काम केले आहे , असे गौरवोद्गार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काढले आहेत. याचबरोबर बेघराना निवारा उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे प्रयत्नही कौतुकास्पद असल्याचे नामदार डाॅ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
          सांगली महापालिकेच्या वतीने जागतिक बेघर दिनानिमित्त सावली बेघर केंद्रात राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सांगलीच्या अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, मनपाच्या उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, युवा नेते जितेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.                यावेळी पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले की, महापालिकेच्या सावली बेघर केंद्राचे काम अत्यंत चांगलं सुरू आहे. ज्यांना समाज स्वीकारत नाही आणि बेघर म्हणून रस्त्यावर फिरतात आशा निराश्रित लोकांना या केंद्रात हक्काचे छत्र मिळवून दिले जाते आहे. याठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था केली जात आहे आणि त्याना पुन्हा समाजात उभे करण्याचे कारम्या केंद्राकडून सुरू आहे. त्यामुळं सावली सारख्या बेघर केंद्राला आणखी बळकटी देण्याची आवश्यकता आल्याचेही ना. कदम यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर कोरोनाच्या काळात सांगली महापालिकेने उल्लेखनीय काम केले असल्याचेही ना.कदम यांनी सांगितले.
          यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी सावली बेघर केंद्राच्या उपक्रमाची माहिती देत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची वाटचाल सुरू असून बेघर केंद्रात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची घराच्या प्रमाणे आम्ही काळजी घेतो असे सांगितले. स्वागत सावली बेघर केंद्राचे मुस्तफा मुजावर यांनी केले तर आभार महापालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे यांनी मानले. कार्यक्रमास मतीन अमीन, विशाल कलगुटगी, अमर निंबाळकर , आनंदा लेंगरे, कयुम पटवेगार, रहीम पट्टेवाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments